नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या ‘बीज माता’ राहीबाई पोपेरे व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज (२५ जानेवारी) राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी त्यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांचा सन्मान झाला होता.
21 people have been conferred with Padma Shri Awards 2020 including Jagdish Jal Ahuja, Mohammed Sharif, Tulasi Gowda and Munna Master. #RepublicDay pic.twitter.com/7blGTjxe9q
— ANI (@ANI) January 25, 2020
पोपटराव पवार हे अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार गावाची दुष्काळी गावाची कायापालट केल्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
एकूण २१ जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर
- जगदीप लाला आहुजा (सामाजिक कार्य)
- मोहम्मह शरीफ (सामाजिक कार्य)
- जावेद अहमद टाक ( दिव्यांगासाठी कार्य)
- तुलसी गौडा (पर्यावरण)
- सत्यनारायण मुंदायूर (शिक्षण क्षेत्रातील कार्य)
- अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य)
- उषा चौमूर (सामाजिक कार्य)
- हरेकला हजब्बा (शिक्षण क्षेत्रातील कार्य)
- अरुणोदय मंडल (आरोग्य क्षेत्र)
- राधामोहन आणि साबरमती (कृषी क्षेत्रातील कार्य)
- कुशल कोनवार सरमा (प्राण्यांसाठी कार्य)
- त्रिनीटी साईओ (कृषी क्षेत्रातील कार्य)
- रवी कन्नन (आरोग्य)
- एस रामकृष्णन (दिव्यांगांसाठी कार्य)
- सुंदरम वर्मा (पर्यावरण)
- मुन्ना मास्टर (कला)
- योगी अॅरोन (आरोग्य क्षेत्रातील कार्य)
- हिंमत राम भांभू (पर्यावरण कार्य)
- मुजीक्कल पंकजाक्षी (कला क्षेत्र)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.