HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; ‘या’ कलमा अंतर्गत होणार कारवाई

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. परंतु, त्यांनी त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केले आणि औरंगाबादमधील सभेत चिथावणीखोर वक्तव्या केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. औरंगाबादच्या सिटी चौकातील पोलीस स्थानकात राज ठाकरेंवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. राज ठाकरे, राजीव जवळीकरसह इतर आयोजिकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राज ठाकरेंवर कलम ११६, ११७, १५३ (अ) आणि म.पो.अ १३५ या अंतर्गत असून त्यांच्यावर अजामानीपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हात राज ठाकरेंचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत आज (३ मे) कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी महासंचालकांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादेच्या सभेसंदर्भात प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास पूर्ण केला असून योग्य ते कारवाई करण्यास पोलीस सक्षम आहेत,” असे ते म्हणाले. या प्रकरणी पोलीस राज ठाकरेंना पोलीस कलम १४९ ची नोटीस देण्यासाठी घरी जाणार असल्याची माहिती सत्रांकडून मिळाली आहे.  

गुन्हा दाखल केलेल्या कलमाची थोडक्या माहिती

  • कलम ११६,  ११७  – गुन्ह्याला मदत करणे 
  • कलम १३५ – अटी शर्तींचा भंग 
  • कलम – १५३ (अ) – चिथावणीखोर वक्तव्य  

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील शिवसैनिकांची आमदार संदीप क्षीरसागर विरोधात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंकडे थेट लेखी तक्रार

Aprna

शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा! – दादाजी भुसे

Aprna

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी जलसंधारण प्रकल्पांच्या कामांना गती द्या! – अब्दुल सत्तार

Aprna