HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

बारामतीत १ कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात संख्या २०४ वर पोहोचली

बारामती | बारामतीत कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. शहरातील श्रमिक नगर येथे हा रूग्ण सापडला असून तात्काळ त्याला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  कोरोनाची लागण झालेला हा व्यक्ती रिक्षा ड्रायव्हर असून तो न्यूमोनियावर उपचार घेत होती. दरम्यान, रिक्षा चालक असल्याने ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. बारामती शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाच्यावतीने नागरिकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा आकडा २०४ वर पोहोचला आहे.

दरम्यान, आज (२९ मार्च) राज्यात २३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुगण्यांची नोद करण्यात आली आहे. तसेच, ३४ जणांना आज डिस्चार्जही देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच, आज मुंबईत १ आणि बुलढाण्यात १ अशा २ कोरोनाबाधितांची मृत्यू झाला. तसेच, देशाचा आकडा १००० च्या पुढे गेला आहे. त्यामूळे केंद्र आणि राज्य सरकार डॉक्टरांच्या मदतीने अहोरात्र कोरोनाला आळा आघलण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

Related posts

महाराष्ट्रात अघोषित लोडशेडिंग !

केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे निधन

News Desk

सार्वजनिक बांधकाम विभागीय अभियंत्याचे दिखाऊ आंदोलन

News Desk