HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, शिवसेनेचा ‘संभाजीनगर’चा मुद्द मनसेकडून हायजॅक

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शहरात बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरमध्ये औरंगाबादला संभाजीनगर करण्याचा पुन्हा एकदा मुद्दा उठवण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून येत आहे. राज ठाकरे हे औरंगबादमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत संभाजीनगरचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बॅनरमध्ये “जगवा महाराष्ट्र…भगवा महाराष्ट्र ! ‘संभाजीनगर’ मध्ये हार्दिक स्वागत…! महाराष्ट्र नवनिर्माण सेना – संभाजीनगर” असे लिहिले आहे.

 

औरंगाबाद शहरात आज (१३ फेब्रुवारी) पुढील तीन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरेंच्या बदलेल्या भूमिकेनंतर औरंगाबाद महानगरपालिका ही पहिली मनसेची निवडणूक असणार आहे. मनसेने नुकतेच पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी मनसे संभाजीनगर हा मुद्दा या निवडणुकीत गाजण्याची स्पष्ट संकेत मनसेने दिले आहेत.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे, असे मनसेने गृहीत धरून संभाजीनगर हा मुद्दा हायजॅक करत असल्याचे सध्या दिसत. मात्र, हिंदुत्वाच्या जीवावर ज्या शिवसेनेने औरंगाबाद शहराला आपला गड बनवले, ती शिवसेना मनसेच्या या भूमिकेचा कडवा विरोध करताना दिसत आहे.

औरंगबाद महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता

सध्या औरंगाबाद शहरात शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत सर्वाधिक 29 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. ९ पैकी ६ आमदार शिवसेनेचे आहेत. महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरही शिवसेनेचीच सत्ता आहे. दुसरीकडे आज घडीला औरंगाबाद शहरात मनसेचा एकही लोकप्रतिनिधी नाही.

Related posts

जगासमोर देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी एअर स्ट्राईकचे पुरावे देणे आवश्यक !

News Desk

शिवरायांच्या उंचीचा नेता-पुतळाही नाही, तुम्हीही सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!

News Desk

महाराष्ट्रातील पोलीसांना शौर्य पदक जाहीर

rasika shinde