HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय तपास यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता, पारदर्शकपणे कारवाई केल्यास विरोध नाही! – अजित पवार

मुंबई | 

 मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे – अजित पवार

राज्यसरकारने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला…

मुंबई | “काही नेत्यांनी अमक्याचा नंबर, तमक्यावर कारवाई असे सुतोवाच केले होते आणि त्यानंतर त्या – त्या व्यक्तींवर कारवाई झालेली आहे. अशा यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे कारवाई केली गेली तर कुणाचाही विरोध नाही,” नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी आज (२६ मे) सकाळी छापे टाकले. अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी आज घेतलेल्या जनता दरबार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले. 

“केंद्रीय यंत्रणा त्यांच्या अधिकारांचा वापर करत कारवाया करत असतात. माझ्याही नातेवाईकांवर मागच्या काळात धाडी टाकल्या होत्या. मंत्री अनिल परब यांच्यावर आज कारवाई सुरु असल्याची माहिती काही लोकांनी दिली. मागे तर काही नेत्यांनी अमक्याचा नंबर, तमक्यावर कारवाई असे सुतोवाच केले होते आणि त्यानंतर त्या – त्या व्यक्तींवर कारवाई झालेली आहे. अशा यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे कारवाई केली गेली तर कुणाचाही विरोध नाही. जसे राज्य सरकारच्या अखत्यारीत सीआयडी, ईओडब्ल्यू, लाचलुचपत विभाग आहे. त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात. तसेच केंद्रीय यंत्रणा देखील काम करतात. कायद्यानेच या यंत्रणांना अधिकार दिलेले आहेत. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा सर्वांची आहे,” असेही अजित पवार म्हणाले.

महिलावर्गाच्या भावना दुखावल्या जातील, असे बोलता कामा नये, अजित पवारांचे आवाहन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही पसंत पडले नसेल. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना असे नेते काही बोलून जातात आणि माध्यमात तेच दाखवले जाते. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केले पाहिजे. कुठलाही समाज किंवा महिलावर्गाच्या भावना दुखावल्या जातील, असे बोलता कामा नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करु नका; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर परखड टीका

News Desk

होळी घराच्या दारात पेटवायची नाही, मग काय घरात पेटवायची? भाजपचा सरकारला सवाल

News Desk

अनेक आंदोलनाचा साक्षी असलेल्या लिंबाच्या झाडाचा अखेर अंत!

News Desk