HW News Marathi
मनोरंजन

अमित शहा स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकात फडकविणार तिरंगा ?

श्रीनगर | केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अजून एक ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे. भारताच्या १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहा श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात गृहमंत्रलयाकडून अद्याप माहिती मिळाली नाही.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या काश्मीर खोऱ्यात असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच स्वातंत्र्यदिनी ते लाल चौकात उपस्थित असतील, असेही सूत्रांनी सांगितले. सुरक्षेचा मुद्दमुळे शहांची काश्मीर भेटीची तारीख मीडियाला सांगता येणार नसल्याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. गृहमंत्री बीएसएफच्या विशेष विमानाने प्रवास करत असतात. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम अखेरच्या क्षणी सीआयएसफसह इतर सरकारी सुरक्षा यंत्रणांना सांगितला जाते. देशातील विमानतळाची सुरक्षा सीआयसीएफकडे असते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानी गायिकेचा ‘जीव रंगला’ मराठीत

News Desk

रिंकू राजगुरू ‘कांगर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

swarit

विकी कौशल आणि कतरिना कैफला सोशल मीडियावरून धमकी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Aprna