HW News Marathi
मनोरंजन

#IndependenceDay : भ्रष्टाचार, हिंसाचार, जातीय-धार्मिक भेदभाव मुक्त देश !

नवी दिल्ली | देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित केले होते. मोदींनी २०१७ रोजी देशाताल संबोधित करताना नव भारताची घडण, काश्मीर, गोरखपूरमधील बालमृत्यू, नोटाबंदी अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. मोदींनी देशवासीयांना नव भारताचे स्वप्न दाखविले.

गोरखपूर बाल मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंचा उल्लेख मोदींनी त्यांच्या भाषणात केला आहे. संपूर्ण देशाला या घटनेचे अतोनात दु:ख झाले आहे. सार

देशाच्या नवनिर्माणाची हाक

“जेथे जनताच सत्ताधीश असेल असा भ्र्रष्टाचारमुक्त, हिंसाचारमुक्त, जातीय-धार्मिक भेदभाव मुक्त देश घडविण्यास आपण कटिबद्ध होऊया”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७१व्या स्वातंत्र्यदिनी केले.मोदींनी देशाच्या नवनिर्माणाची हाक दिली. २०२२ सालापर्यंत नवभारताला मूर्त स्वरूप देण्यासाठी देशवासीयांनी झटले पाहिजे.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • पाकिस्तान किंवा चीन थेट उल्लेख नाही
  • नवभारताची घडण, काश्मीर, गोरखपूर बालमृत्यू,नोटाबंदी यांचा उल्लेख त्यांनी केला

“चलता हे” मानसिकतेचा काळ संपला

“चलता है” मानसिकतेचा काळ आता संपला आहे. बदल झाला आहे, बदल होत आहे आणि बदल शक्य आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले. श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार नको, बंदुकीने काश्मीर प्रश्न सुटणार नाही, गोरखपूर बालमृत्यूंचा उल्लेख.

“पाकिस्तानच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, जमीन, आकाश, समुद्र, सायबर आणि युद्धभूमी अशा कुठेही आम्ही आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत”, असेही मोदी यांनी ठणकावून सांगितले. देशाच्या संरक्षण दलांनी प्रत्यक्ष युद्धात आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईक नंतर जगाने भारताची ताकद मान्य केली आहे. आपल्या देशातील दहशतवाद संपूर्णपणे निपटून काढला जाईल असेही ते म्हणाले. वस्तू व सेवा करासह अनेक सरकारी योजनांचा उल्लेख
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लग्नाआधी सेक्स करणे कॉमन गोष्ट :भूमी पेडणेकर

News Desk

‘आर्ट एक्सपो’च्या प्रदर्शनात हातमागाचे वैविध्य पाहून ‘श्रेया बुगडे’ झाली दंग

News Desk

Kumbh Mela 2019 : जाणून घ्या… कुंभमेळ्याचे धार्मिक महत्व

News Desk