HW News Marathi
देश / विदेश

टेलिप्रॉम्टर बंद पडले; पंतप्रधान मोदी गडबडले

मुंबई | वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१७ जानेवारी) विशेष भाषण केले होते. मोदी हे जगभारतील देशांना संबोधित करताना भारत सध्या कोरोनाशी समाना करत असताना देखील आर्थिक वाढ कायम राखत, असे ते भाषणतून ते सांगत होते. परंतु, मोदींच्या भाषणाची चर्चा होण्यापेक्षा जास्त चर्चा होते, ती म्हणजेंचे भाषणादरम्यान  टेलिप्रॉम्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पंतप्रधान थोड्या वेळेसाठी गोंधळून गेले. यावरून सोशल मीडियावर मोदींचाहा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

 मोदी भाषण करताना म्हणाले, “भारतीय कोरोनाशी कसा लढा दिला. याबाबत भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे. आम्ही भारतीयांचे सहशक्ती आणि भारतीयांचे टॉलेंट, असे बोलत असताना अचानक टेलिप्रॉम्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. यानंतर पंतप्रधान मोदी गोंधळून गेले आणि ते भाषण देताना थांबले. आणि  मोदींनी स्क्रीनच्या आजू-बाजूला बघायला लागेल. यानंतर मोदींनी हातवारे केले आणि कानात हेडफोन लावून त्यांच्या उपस्थिती व्यक्तीला त्यांचे ऐकू येते का?, असे विचारले. ती व्यक्ती म्हणाली होय, मला ऐकू येत आहे. 

या घटनेनंतर विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली. यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।”. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलकर त्यांनी देखील खिल्ली उडवली, “हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त

News Desk

राजीव सातव एक सक्षम उभरतं नेतृत्व, संसदेतील चांगला मित्र गमावला, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार हत्याकांडानंतर सेमी ऑटोमॅटीक रायफल्सच्या विक्रीवर बंदी

News Desk