HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालायचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | शिवसेनेचा पदाधिकारी संतोष परब प्राणघातक हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. नितेश राणेंना न्यायालाकडून मोठा झटका मिळाला आहे. संतोष प्राणघातक हल्ला प्रकरणी नितेश राणेंवर आरोप होता. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (१७ जानेवारी) सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी कणकवलीमधील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दखील राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. 

विधीमंडळच्या हिवाळी अधिवेशनात नितेश राणेंनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची म्यॉव म्यॉव चिडवल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचा दावा त्यांनी न्यायालायत केला. तर आता नितेश राणे अटकपूर्व जामीनसाठी सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देता येईपर्यंत कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी नितेश राणेंच्या वकिलाने केली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा आज १२. ३० वाजता सुनावणी होणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात, कर्नाटक, उत्तराखंडनंतर भाजप आणखी एक मुख्यमंत्री बदलणार!

News Desk

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का!

News Desk

HW Exclusive : मानसिक छळाबाबत डॉ. पायल यांच्या मित्राचा खुलासा

News Desk