नवी दिल्ली। देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील शाळा बंद ठेवल्या असल्या तरी ऑनलाईन शाळा सुरू आहेत. परंतु कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याचे मत जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाचे संचालक जखमी सावेंद्र यांनी व्यक्त केले आहे. कोरोनामुळे जगभरातील शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसला असून कोरोना काळात शाळा या सुरक्षित नाही हे अद्याप सिद्ध झाले नाही. जगभरात कोरोनाची दुसरी-तिसरी लाट आली, त्याही वेळेला शाळा बंद करण्यात आले येऊन गेली.
मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांची प्रकृती गंभीर होण्याचे आणि मृत्यू पडण्याचे प्रमाम कमी आहे. तर जगभरात ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असला तरी मुलांना याचा फारसा धोका नाही. त्याचबरोबर मुलांचे लसीकरण झाल्यानंतर शाळा सुरू करू अशी भूमिका कोणत्याही देशाने घेतलेली नाही. देशात कोरोनामुळे शाळा बंद ठेवल्याने अनेक मुले ही शालेय शिक्षणापासून वंचित राहली आहेत, असे मत सावेंद्रांनी व्यक्त केले आहे.
येत्या १५ दिवसात रुग्ण वाढीचा वेग पाहून शाळासंदर्भात निर्णय घेऊ – राजेश टोपे
महाराष्ट्रा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. आता येत्या काही दिवसात शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संघटना आणि इंग्रजी शाळा आग्रही आहेत. तर दुसऱ्या बाजुला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे शाळा सुरु करण्याबात म्हणतात, “येत्या १५ दिवसांतील कोरोना रुग्ण वाढीचा वेग आणि उपाय योजनाचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत विचार करू. आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील, असे ते काल (१६ जानेवारी) म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.