HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या आवाहनाला एसटी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी स्वतः शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तर त्यांच्या या आवाहनाला एसटी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहनही केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत आज (१० जानेवारी) एसटीच्या कृती समितीची बैठक झाली आहे. या बैठकीदरम्यान २२ वेगवेगळ्या एसटी कर्मचारी संघटनांची प्रदिर्घ चर्चा झाली. या बैठकीला सर्व श्रमिक संघटना उपस्थित होत्या. सातवा वेतन आयोग तसंच कारवाई मागे घेण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे सर्व कामगारांनी कामावर रुजू व्हावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जे कर्मचारी कामावर रुजू होतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विलनिकरणासाठी १२ आठवड्यांची मूदत देण्यात आली आहे. तर या संपादरम्यान एसटीचे अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ व निलंबनाची कारवाई झाली होती, तर त्यांनाही पुन्हा सेवेत घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बैठकीत सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आहे.

शरद पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवा

दरम्यान, या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेण्याचे जाहीर आवाहन केले. बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई न्यायालयावर सोपवूया आणि कामावर हजर होऊया, असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचं शरद पवारांनी आश्वासन दिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. त्यांचा शब्द वाया जाणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन तातडीने कामावर हजर राहावे, असे आवाहन एसटीच्या सर्व संघटनांच्या प्रमुखांकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार कार्ड पडताळणीसाठी आता चेहऱ्याचा आधार

swarit

दादा आपल्या स्टाईलने केंद्र सरकारशी भांडून हक्काचे पैसे खेचून आणा, रोहित पवारांची काकांना विनंती!

News Desk

राज्यातील जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची राज्यस्तरीय २४x७ हेल्पलाईन

swarit