HW News Marathi
Covid-19

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० हजारचा टप्पा

मुंबई। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईत काल (६ जानेवारी) तब्बल २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ७९ हजार २६० सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा २९.९०टक्के ऐवढा नोंदविला आहे. राज्यात काल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच राज्यात काल ३६ हजार २६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ८ हजार ९०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ६५ लाख ३३ हजार १५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा २.०८ इतका झाला आहे. राज्यात सध्या ५ लाख ८५ हजार ७५८ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून १ हजार ३६८ व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात गेल्या २४ तासात ८ हजार ९०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ६५ लाख ३३ हजार १५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

राज्यात लॉकडाऊन लागणार?

“मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्ण आढळल्यानं आता शहरात लॉकडाऊन” असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते. महापौरांच्या विधानाला महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी देखील दुजोरा दिला होत. यामुळे आता लॉकडाऊन लागणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, २२ मेपासून पदभार सांभाळणार

News Desk

…तर जानेवारीपासून महाराष्ट्रात लसीकरणाला सुरुवात करु – राजेश टोपे

News Desk

उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरु, लॉकडाऊनवर चर्चा

News Desk