मुंबई | “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेलेल्या निर्णयानंतर ट्वीट करत आनंद व्यक्त केला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, केंद्र सराकर आणि विधीमंडळाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना पाच दिवसांत आपली बाजू मांडण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने पाठविली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 12 जुलै रोजी होणार आहे. न्यायालयात बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविल्या विरोधातात सर्वोच्च न्यायालयात आज (27 जून) सुनावणी पार पडली.
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!” यानंतर शिंदेंनी अजून एक ट्वीट केले. यात साताऱ्यामधील पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. शंभुराजे देसाई म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पाच विभागांचा राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये मी काम करत आहेत. खाते आमच्याकडे दिले खरे पण राज्यमंत्र्यांला किती अधिकार होते. परंतु, सर्व सामान्य शिवसैनिक आणि आमदारांना राज्यमंत्र्यांकडे गेले की लगेच काम होते, असे वाटत होते. पण लोक प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची कामे शिफारस करून कॅबिनेट मंत्र्यांवडे देणे इतकेच काम होते. राज्यमंत्री हे फक्त विधानसभेच्या अअधिवेशनात सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि कामकाज हाताळणे ऐवढ्या पुरते राज्यमंत्री म्हणून काम करत होतो,” असे ते म्हणाले.
#सातारा जिल्ह्यातील #पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री श्री.शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले ते खालीलप्रमाणे आहे…@shambhurajdesai#MiShivsainik pic.twitter.com/b3ywV8Tb0s
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
संबंधित बातम्या
शिंदे गटाला मोठा दिलासा! अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार तुर्तास टळली
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.