HW News Marathi
देश / विदेश

देशातील एकूण कोळसा उत्पादनात ७४.७८ दशलक्ष टनांची वाढ

नवी दिल्ली। डिसेंबर २०२१ मध्ये भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात, आधीच्या वर्षी म्हणजे २०१९ च्या तुलनेत ६.७४ ची म्हणजेच, ७४.७८ दशलक्ष मेट्रिक टन इतकी वाढ नोंदवली गेली. डिसेंबर महिन्यातील एकूण उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने ६०.२२० मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन करत, ३.७९% ची वाढ नोंदवली आहे. कॅप्टिव्ह खाणी, म्हणजेच कंपनीच्या मालकीच्या खाणींनी ८.९१ मेट्रिक टन इतक्या कोळशाचे उत्पादन करत, ४०.९८% ची विक्रमी वाढ नोंदवली आहे. त्याचवेळी, सिंगरेनी कोलियरीज लिमिटेड या कंपनीने डिसेंबर महिन्यात केवळ ५.६५ मेट्रिक टन कोळसा उत्पादन करत, उणे १.१२% अशी नकारात्मक वाढ नोंदवली आहे.

२०१९ वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत, डिसेंबर २०२१ मध्ये कोळशाच्या पुरवठ्यात १४.६२% पासून ७५.०५ मेट्रिक टनपर्यंत वाढ झाली आहे. या काळातील एकूण उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेडने ६०.६७ मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करत, १२.७०% ची वाढ नोंदवली आहे. सिंगरेनी कोलियरीज लिमिटेडने ५.७० मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करत २.०१ टक्के कोळशाची वाढ नोंदवली आहे. तर कॅप्टिव्ह खाणीतून ८.६८ मेट्रिक टन कोळसा पुरवठा होऊन, ४३.२३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

वीजेसाठी लागणाऱ्या कोळशात, डिसेंबर २०२१ मध्ये, २०.०६ % म्हणजे ६३.३२ मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये हे उत्पादन ५२.७४ मेट्रिक टन इतके होते. कोळसा-आधारित म्हणजेच औष्णिक ऊर्जा निर्मितीत डिसेंबर २०२१ मध्ये ११.८४ % ची वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात एकूण वीजनिर्मिती, २०१९ च्या तुलनेत, ८.३२ % अधिक होती. देशात कार्यरत प्रमुख ३५ कोळसा खाणींपैकी ११ खाणी १०० % पेक्षा अधिक तर १२ खाणींमधील उत्पादन ८० % पेक्षा अधिकमात्र १०० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त!

News Desk

विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ईव्हीएममध्ये मोठा बदल

News Desk

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

News Desk