HW News Marathi
महाराष्ट्र

सगळंच पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका!

पुणे। कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. केंद्राने सुद्धा खबरदारी घेण्यास सांगितले होते. केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल. त्यामुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरडावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका

याशिवाय शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगतिलं.अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही म्हणून ही वेळ आली आहे. पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका. सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांवर भडकले

काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी सांगितला.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांवर भडकले. राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हमाले.

बातम्या देताना काळजीपूर्वक द्या

धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.राजू शेट्टी यांचा पत्ता कट आणि हेमंत टकले यांना संधी याही बातम्या कुठून येतात कळत नाही, त्यामुळे बातम्या देताना काळजीपूर्वक द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार! – अजित पवार

News Desk

अखेर राज्यपालांकडून निमंत्रण! अजित पवार म्हणाले…..

News Desk

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांंना सुनावले!

News Desk