HW News Marathi
राजकारण

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना; कॅबिनेटच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब?

मुंबई | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार येवून 22 दिवस होऊनही कॅबिनेटचा विस्तार अजूनही झालेला नाही. कॅबिनेटच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आज (22 जुलै) दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी कॅबिनेटसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर कॅबिनेटचा विस्तार हा 25 तारखेनंतर होणार असल्याची शक्ता वर्तवली जात आहे.

दरम्यान, दिल्लीत शिंदे सरकारच्या कॅबिनेटची यादी अंतिम होईल आणि यानंतरच मंत्रिमंडळाचा मुर्हूत ठरविला जाईल. दिल्लीत उद्या (23 जुलै) भाजप कार्यकारणीची बैठक, रविवारी (24 जुलै) भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आणि (25 जुलै) नवीन राष्ट्रपतींचा शपथ विधी होणार आहे. यामुळे 25 तारखेपर्यंत शिंदे सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. राज्याच्या कॅबिनेटचा विस्तार आणि शपथ विधी हा 26 किंवा 27 जुलै रोजी होऊ शकतो.

शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांचे मत्री पद कायम राहतील, अशी शक्यता वर्तवली जाते. परंतु, शिंदे गटाकडून 13 ते 14 मंत्री पदांची मागणी केली जात आहे. यानुसार शिंदे गटाती दादा भुसे, उदय सामंत, बच्चू कडू, गुलाबराव पाटील आदी मंत्री आहेत. या सर्वांची मंत्री पदेही कायम राहतील. आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि शिंदे गटातील नवीन चेहऱ्यांना देखील कॅबिनेटमध्ये स्थान मिळले.

 

Related posts

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

News Desk

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

News Desk

सरकारने कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे !

News Desk