HW News Marathi
महाराष्ट्र

रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या भेट घेतली आहे. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी आज (27 जुलै) भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रतन टाटा यांनी भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि रतन टाटा यांच्या भेटीदरम्यान 45 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीत राज्यातील उद्योग व्यवसायासंदर्भाच चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच रतन टाटांची भेट घेतली आहे.

कोरोनामुळे देशातील उद्योगविश्वाला मोठा फटका बसला असून यातून उद्योगला चालना देण्यासाठी सरकारकडून काय उपयोजना करण्यात येतील यासंदर्भाच चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयादशमीला शस्त्रपूजन करणारच | संघ

Gauri Tilekar

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय… चंद्रकांत पाटील यांचा रोहित पवारांवर निशाणा

News Desk

बारामतीमध्ये कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

News Desk