मुंबई | नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील जनता दल (जेडीयू) आणि भाजप यांची युती तुटली आहे. नितीश कुमार यांनी आज (9 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी बिहारच्या राज्यपालांची भेट घेतली. या भेट घेऊन नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. “आम्ही एनडीएची साथ सोडली”, असे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय राजकारणात बिहारमधील भाजप-जेडीयूची युती तुटल्यामुळे मोठा झटका असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.
नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केल्यानंतर आता दुसरी सरकार स्थापन होईपर्यंत बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जेडीयू-भाजपची युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशा बातम्या येत होत्या. परंतु, आज अखेर नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या राजकारणातील परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
Nitish Kumar resigns as Chief Minister of Bihar, breaks alliance with BJP#BiharPoliticalCrisis pic.twitter.com/GwtSlL2KG8
— ANI (@ANI) August 9, 2022
बिहारमध्ये युती तुटल्यानंतर नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दलच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांचे नवे सरकार स्थापन होणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. नवीन सरकारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री असणार आहेत. बिहारमधील नव्या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा दर्शविला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.