मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार (Cabinet Extension) झाला आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 9 तर शिंदे गटातील 9 एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना संधी दिली आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या मंत्रीपदामुळे भाजपला मुंबई महापालिकेत फायदा होण्याची शक्यता व्यक्त वर्तवली जात आहे.
मंगलप्रभात लोढा यांची दक्षिण मुंबईत लोढा यांचे वर्चस्व आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या वर्चस्वाचा फायदा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपने आखल्याली रणनिती आहे. मारवाडी समाजातील भाजपचा प्रमुख चेहरा अशी लोढा यांची ओळख आहे. आता मंगलप्रभात लोढा यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यावसायिकांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचे नाव आहे.
मंगलप्रभात लोढा यांचा परिचय
मंगलप्रभात लोढा यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 साली जोधपूर येथे जैन कुटुंबात झाला. मंगलप्रभात लोढा यांचे वडील गुमाल माल लोढा स्वातंत्र्यसैनिक आणि न्यायाधीश होते, तर आई मंजू लोढा गृहिणी होती. मंगलप्रभात लोढा यांनी बी.कॉमचं शिक्षण पूर्ण करून LLB पदवी प्रात्प केली. त्यानंतर मंगलप्रभात लोढा जोधपूरमध्ये वकील म्हणून कार्यरत होते. लोढांना मुंबईत वकीली ऐवजी रिअल इस्टेट फर्ममध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या मित्राच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात जोडले गेले. मंगलप्रभात लोढा 1982 साली रिअल इस्टेट व्यवसायात नाव कमविले. मंगलप्रभात लोढा 1990 साली ते राजकारणाकडे वळाले. त्यांचे संघासोबत लहानपणापासूनच नाते होते. मंगलप्रभात लोढांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या 1990 सालीच्या रथयात्रेने ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी 1993 साली भाजपमधून काम करण्यास सुरुवात केली. 1995 मध्ये मंगलप्रभात लोढा यांना पहिल्यांदा मुंबईतील मलबारहिलमधून उमेदवारी मिळाली. काँग्रेसचे बी.एस.देसाई यांचे प्रभुत्व असलेल्या मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा विजय मिळवला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. भाजपमध्ये मंगलप्रभात लोढा यांची ताकद वाढली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.