HW News Marathi
राजकारण

“मला पहिल्या पंगतीत बसवले असते तर…”, बच्चू कडू मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर म्हणाले…

मुंबई | “मला पहिल्या पंगतीत बसवले असते तर माझा सन्मान वाढला असता,” अशी खंतही प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी व्यक्त केली. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) काल (9 ऑगस्ट) विस्तार झाला. या मंत्रिमंडळानंतर बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यानंतर बच्च कडूने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

बच्चू कडू म्हणाले, “राजकारण स्वत:साठी नाही, तर सर्वसामान्य जनतेसाठी करायला हवे. योग्य वेळी योग्य घाव मारावा लागतो. हे बंड जनतेसाठी केले आहे. राजकारण हे घरी बसून चालत नाही.” बच्चू कडू पुढे म्हणाले, “मला मंत्रिमंडळाच्या पहिल्या पंगतीत बसवले असते तर माझा सन्मान वाढला असता. राठोडांच्या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “राठोडांविरुद्धात सिद्ध झाले तर विरोधाला अर्थ आहे,” असे ते म्हणाले.

“जे उशिरा आले त्यांना पहिल्या पंगतीत बसवले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवले आहे. परंतु, ही काही नाराजी नाही तर राजकारणात असे चालू राहते. आम्ही तितके समजूतदार आहोत. आम्ही शिंदे गटात मंत्रिपदासाठी गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे.  म्हणून बच्च कडू नाही, मंत्रीपदा पेक्षा बच्चू कडू जासत् महत्वाचा आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk

जातीचे नाव काढेल त्याला ठोकून काढेन, गडकरींचा इशारा 

News Desk

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा भाजपसरकारविरोधात हल्लाबोल…

News Desk