HW News Marathi
महाराष्ट्र

कपड्यांवरील GST वाढवण्याचा निर्णय मागे; जीएसटी परिषदेमध्ये घेतला निर्णय

मुंबई | नवीन वर्षात कपड्यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ४६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. कपड्यांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर वाढवण्याच्या निर्णयावर आज (३१ डिसेंबर) बैठकीत चर्चा झालल्यानंतर हा निर्णय मागे घेतला. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

दरम्यान, कपड्यांवरील ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर जीएसटी करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२२पर्यंत पुढे ढकलला आहे. मात्र,  चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे आता नवीन वर्षात चप्पल आणि बुटांच्या किंमती वाढ होणार हे नक्की आहे. या बैठकीत चप्पल आणि बुटांवर वाढलेल्या किंमती वाढवण्याच्या निर्णयावर तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी विरोध केला आहे. 

तसेच क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) यांनी केंद्र सरकारच्या जीएसटीचे दर वाढवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे कापड उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सीएएमएआय नारजी मागचे कारण सांगताना म्हणाले, देशात जीएसटी दराचे चार स्थर आहेत.  ५ टक्के, १२ टक्के १८ टक्के आणि २८ होत आहे. 

https://twitter.com/PIBMumbai/status/1476816889154207744?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंना हजार रुपये पाठवा | धनंजय मुंडे

swarit

काकडी लागवडीमुळे शेतकरी झाला कर्जबाजारी

News Desk

चित्रा वाघ यांच्यावर भाजपचा आणखीनच दृढ विश्वास ! सोपवली नविन जबाबदारी

News Desk