HW News Marathi
राजकारण

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन आहे. राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज (18 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे.  शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी करण्यास सुरु आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारचा  ‘ईडी सरकार’ असा उल्लेख निषेध केला. ’50 खोके, एकदम ओके’, ‘ईडी सरकार, हाय हाय’, घोषणाबाजी देत होते.

दरम्यान, विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘स्थगिती सरकार हाय हाय!’, ,बेकायदा सरकार, हाय हाय’, ,गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी’, विरोधकांनी विधीमंडळाच्या पाऱ्यांवर हातात पोस्टर घेऊन विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात,  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंमबादास दानवे आदी नेते मंडळी पायऱ्यांवर उभी आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारविरोधात दिलेल्या घोषणा. या विशेष लक्ष वेधी ठरल्या होत्या.  ‘आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार आसो,’ ‘सुधीर भाऊला चांगले सरकार न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशी मिश्कील घोषणाबाजी केली होती.

 

धनंजय मुंडेंनी दिल्या ‘या’ घोषणा

विधीमंडळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री दाखल झाल्यावर विरोधकांनी ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘आले रे आले गद्दार आले’, अशा घोषणाबाजी दिल्या आहेत. ‘ओला दुष्कार जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार आसो’ धिक्कार असो’, ‘आशिष शेलारला पुन्हा एका मुंबईचा अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘संजय शिरसाट सरकारचा धिक्कार असो’, ‘अरे ईडी सरकार हाय हाय’, ‘अरे ईडी सरकार हाय हाय’, ‘शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो’, ‘सुधीर भाऊला चागले सरकार न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,” असा टोला सुधीर मुगंटीवार आणि आशिष शेलार यांना टोला लगावला.

संबंधित बातम्या

शेलार, मुनगंटीवारांना योग्य पद न देण्यावरून धनंजय मुंडेंची सरकारविरोधात मिश्कील घोषणाबाजी

Related posts

हिंदू मतांच्या गणितासाठी भाजपच्या संकल्पपत्रात पुन्हा ‘राम मंदिरा’चा उल्लेख

News Desk

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा स्थगित, सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य 

News Desk

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk