HW News Marathi
महाराष्ट्र

जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा यंत्रणांना यश

मुंबई | जम्मू-काश्मीर येथील कुलगाम आणि अनंतनाग या दोन जिल्ह्यांमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील दहशतद्यांकडून जम्मू-काश्मीर कारवाया केल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे. या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. सहा दहशतवाद्यांपैकी चार जणांची ओळख पटली आहे असून दोन जण पाकिस्तानी आणि दोन जण काश्मीरमधील दोन स्थानिक होते. तसेच इतर दोन दहशतवाद्यांना ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

दहशतवाद्यांकडून अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्या कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.यात सुरक्षा काल रात्रीपर्यंत सुरक्षा दलाकडून चार दहशतवाद्यांनी ठार केल्याची माहिती पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. यानंतर आज (३० डिसेंबर) पुन्हा दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलण्यात पोलिसांना यश आले.

https://twitter.com/KashmirPolice/status/1476334916824489989?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामसेवकावर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी

News Desk

सेना- मनसे- भाजप – असा प्रवास करत सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये स्थिरावणार

News Desk

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

News Desk