मुंबई | “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असे खोचक ट्वीट करत मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिंदे गट आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांकडून दसरा मेळाव्यावरुन (dasara melava) रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशपांडेंनी ट्वीट करत दोघांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातील भाषणातून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. देशपांडेंनी राज ठाकरेंच्या भाषणातील विधानावरून टोला लगावला आहे.
देशपांडेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असे ट्वीट केले असून राज ठाकरेचा फोटो ट्वीट करत आहे. या फोटवर “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” लिहिले आहे.
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहोत. कारण दसरा मेळावा हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, हे तुम्हाला कळेल,” असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे. यावर उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेतून प्रतित्तर देत म्हटले, “दसऱ्या मेळाव्यासंदर्भात संभ्रम कोणाचा नाही. तो शिवसेनाचा म्हणजे आमचा होणार. सभ्रम निर्माण करणाऱ्यांनी सभ्रम निर्माण करू द्या. पण शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचा मेळावा हा दसऱ्याला होणार. आणि शिवतीर्थावरच होणार.”
राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे काहीही नसले तरी बाळासाहेबांचे विचार आहेत. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असे म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.