मुंबई | आयडीसी सेलफोर्स इकोनॉमीच्या अभ्यासानुसार, २०२१ मध्ये डिजिटल कौशल्याची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये २७% वरून २०२६ पर्यंत ३७% वृद्धी होईल. भरती करणारे (HR) एक व्यापक कौशल्ये शोधत असतील आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॉक चेनद्वारे चालविले जाणाऱ्या नोकऱ्या असतील जसे कि डेटा सायंटिस, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशिअल टेकनॉलॉजि इ.
ही गरज लक्षात घेऊन, जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेडने (Jetking Infotrain Limited) मुंबईत त्यांचे ६ वे केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र NSDC प्रमाणित अभ्यासक्रम जसे की मास्टर्स इन क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, मास्टर्स इन ब्लॉकचेन डेव्हलपमेंट (टेकनॉलॉजी आणि नॉन-टेकनॉलॉजि, पदवीधर आणि इतर अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम जसे की इथिकल हॅकिंग, अॅमेझॉन सेवा, मायक्रोसॉफ्ट अॅझ्युअर इत्यादी कोर्सेस या मध्ये समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात बोलताना जेटकिंगचे सीईओ आणि एमडी हर्ष भारवानी म्हणाले की, त्यांनी मुंबईतील प्रमुख ठिकाणांपैकी एक दादर ह्या महत्वाच्या ठिकाणी जेटकिंगचे ६ वे केंद्र उघडले आहे. ते त्यांच्या टीम सह विद्यार्थ्यांना डिजिटल स्किल शिकवणे आणि त्यांना रोजगारक्षम बनवणे उदिष्ट घेऊन पुढे जाणार असल्याचे म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार व माजी शिक्षण व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, जेटकिंगने युवकांना डिजिटल कौशल्याची दृष्टी दिली आहे, जी आज देशाची दृष्टी बनली आहे. आणि हा विचार, दृस्टि भारवानी परिवाराने दिला आहे. आज आपल्याला केवळ रोजगाराचा विचार करायचा नाही तर रोजगार निर्मितीही करायची आहे. आज, मी जेटकिंगचे सीईओ हर्ष भारवानी आणि टीमचे डिजिटल कौशल्यांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
या प्रसंगी बोलताना डॉ.जयश्री जी.अय्यर (प्राचार्य, डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, वडाळा, मुंबई) म्हणाल्या, आपला देश मानव संसाधनाने परिपूर्ण आहे. आपण आपल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे जेणेकरून ते आपल्या भावी समाजाचे आधारस्तंभ बनतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.