HW News Marathi
राजकारण

शिंदे गटाला धक्का देत मनसेचा पालिका निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई | गणेशोत्सवा निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर राज ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जावून बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर आगामी पालिका निवडणुकीसाठी शिंदे गट (Shinde Group) आणि मनसे (MNS) एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

मनसे आगामी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचा आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. यामुळे मनसे मुंबईतील 227 जागांवर उमेदवार उभा करण्याची माहिती देशपांडेंनी दिले आहे. मनसेच्या ” एकला चलो रे’च्या नाऱ्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते.

शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून त्यांचा पक्ष हीच करी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून शिंदे गट आणि शिवसेना दोघे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. या प्रकरणावर 22 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे मनसे शिंदे गटापासून युती करण्यासंदर्भात गोंधळात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यकर्ते ज्या विकासाचे श्रेय घेत आहेत तो विकास कोणता ? – ठाकरे

News Desk

“पंतप्रधान मोदी नीच” या आपल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर ठाम

News Desk

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk