HW News Marathi
महाराष्ट्र

मांसविक्रीवर बंदी तर या व्यवसायातील लोकांना आदित्यनाथांकडून दूधविक्रीचा सल्ला!

नवी दिल्ली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारु आणि मांसविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिलेत. सोमवारपासून हे आदेश लागू झाले आहेत. “यासंदर्भातील अधिकाऱ्यांना बंदी घालण्याबद्दलची आवश्यक कारवाई करण्याबरोबरच अशा व्यवसायांमध्ये असणामऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत,” असं योगींनी या निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं. कृष्णोत्सव २०२१ या जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री बोलत होते.

कृष्णाकडे कोरोना विषाणूचा खात्म करण्यासाठी प्रार्थना

मांसविक्री करणाऱ्या आणि दारुची दुकानं असणाऱ्यांनी आता दूध विक्री करुन मथुरेला पुन्हा एकदा जुनी ओळख मिळवून द्यावी असं योगी म्हणाले आहेत. मथुरा पूर्वी चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन करणारं शहर म्हणून ओळखलं जायचं असंही योगी म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना आदित्यनाथ यांनी भगवान श्री कृष्णाकडे कोरोना विषाणूचा खात्म करण्यासाठी प्रार्थना केली. “ब्रज भूमी साकारण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी निधी देण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कृती तसेच अध्यात्मक याचा सुरेख मेळ घालून हा भाग विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं योगी म्हणाले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं. मोदींनी देशाला नवीन दिशा दिली असल्याचं सांगत योगींनी मोदींच्या कार्याचं कौतुक करत केंद्र सरकारने केलेल्या कामाला अगदी मोजक्या शब्दात लेखाजोखा मांडला. धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या स्थळांकडे यापूर्वी दूर्लक्ष केलं जात होतं. मात्र आता या शहरांकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचंही योगी यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घ्या, पत्राद्वारे संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” सरकारला आमदाराचा घरचा आहेर

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच !

News Desk