टोक्यो | टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. आतापर्यंत आठ पदकं पटकावलेल्या भारतीय खेळाडूंनी आता एकाच खेळात दोन पदकं खिशात घातली आहेत. उंच उडी स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावत भारताने रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. यामध्ये मरियप्पन थंगावेलुने रौप्य तर शरद कुमारने कांस्य मिळवलं आहे.
"The indomitable Sharad Kumar has brought smiles on the faces of every Indian by winning the Bronze Medal. His life journey will motivate many. Congratulations to him," tweets PM Narendra Modi. #TokyoParalympics pic.twitter.com/TYz91m9ycW
— ANI (@ANI) August 31, 2021
"Soaring higher and higher! Mariyappan Thangavelu is synonymous with consistence and excellence. Congratulations to him for winning the Silver Medal. India is proud of his feat," tweets PM Narendra Modi. #TokyoParalympics pic.twitter.com/Kg32Nh5Cyz
— ANI (@ANI) August 31, 2021
भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण
भारतासाठी हे एकाच दिवशी सलग दुसरे सुवर्ण पदक आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच आहे. सुमितच्या आधी भारताला नेमबाजीतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले आहे.
भारताच्या खिशात 10 पदकं
भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. आता उंच उडीमध्ये मरियप्पन थंगावेलु आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्य पदक मिळवून दिल्यामुळे भारताकडे दोन पदकं वाढली आहेत. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण 10 पदकं झाली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.