HW News Marathi
क्राइम

अभिनेता अन्नू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक; ओशिवरा सायबर पथकाने Golden Hour मध्ये वसुली रक्कम

मुंबई | बॉलीवुड दिग्गज अभिनेता अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना तब्बल 4 लाख 36 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. अज्ञाताने कपूर यांना फोन करत कृष्णकुमार रेड्डी असे नाव सांगितले. एच एस बी सी (HSBC) बँकेच्या हेड ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगत, एचएसबीसी बँकेच्या खात्याची केवायसी (KYC) करणे बाकी असल्याने केवायसी केली नाही तर बँक खाते बंद होईल असे सांगत फसवणूक केली. अन्नू कपूर यांना त्यांची 4 लाख 36 हजार रुपयांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समजताचं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ओशिवरा सायबर पथकाला फसवणूक झालेल्या रक्कमे पैकी 3 लाख 8 हजार रुपये फ्रिज करण्यात यश मिळाले असून ही रक्कम अन्नू कपूर यांना रिफंड करण्याकरिता बँकेची प्रक्रिया सुरू आहे.

 

एचएसबीसी बँकेच्या खात्याची केवायसी करणे बाकी असल्याने केवायसी केली नाही तर बँक खाते बंद होईल असे आरोपीने कपूर यांना फोन करून सांगितले, त्यानंतर कपूर यांनी केवायसी करण्याकरिता काय करावे लागेल असे विचारले. तेव्हा, कृष्णकुमार रेड्डी याने बँकेचे खाते क्रमांक व त्यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी क्रमांक द्यावे लागेल असे सांगून त्याने कपूर यांचा विश्वास संपादन केला. नंतर, कपूर यांच्याकडून एचएसबीसी बँकेचे खाते क्रमांक व मोबाईलवर प्राप्त झालेले ओटीपी घेत त्यांना त्यांच्या बँकेचे केवायसी झाल्याचे सांगितले.

 

त्यानंतर काही वेळात अन्नू कपूर यांना त्यांच्या मोबाईलवर एचएसबीसी बँकेच्या कस्टमर केअर वरून कॉल आला व त्यांनी त्यांचे खाते कॉम्प्रोमाइज झाले असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख अधिक 2 लाख 36 हजार रुपये असे एकूण 4 लाख 36 हजार वजा झाल्याचे सांगितले व त्यांचे खाते बंद केले. हकीकत समजताच अन्नू कपूर यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. ओशिवरा सायबर पथकाने तात्काळ त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन भारतीय भारतीय दंड संहिताचे कलम 419, 420 आणि भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदाचे कलम 66(c)(d) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

 

ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी पोलीस उप निरीक्षक कुरकुटे, हेड कॉन्स्टेबल कोंडे, कॉन्स्टेबल सरनोबत  यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे, अन्नू कपूर यांच्या एचएसबीसी बँकेचे मॅनेजरशी संपर्क करून, झालेल्या ट्रांजेक्शनची माहिती घेतली. तपासात फसवणूक झालेली रक्कम ही कॅनरा बँक व युनियन बँकेच्या खात्यामध्ये डेबिट झाल्याचे समजले. अन्नू कपूर यांचं हे बँक खाते डेबिट फ्रिज करण्याकरिता कॅनरा बँक व युनियन बँकेच्या मॅनेजर/नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार केला. दरम्यान, फसवणूक झालेल्या रक्कमे पैकी 3 लाख 8 हजार फ्रीज करण्यात ओशिवरा सायबर पथकाला यश झाले असून ही रक्कम अन्नू कपूर यांना रिफंड करण्याकरिता बँकेची प्रक्रिया सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बचपन बचाव आंदोलन मुलांचे संरक्षण करणारे कायदे सक्षम करण्याची मागणी

swarit

नांदेड पोलीसांनी प्रतिज्ञा घेऊन दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला

News Desk

मलिकांच्या आरोपानंतर आता वादात अमृता फडणवीसांची उडी…

News Desk