HW News Marathi
महाराष्ट्र

आव्हाडांनी माझा बाप काढला, ती त्यांची संस्कृती…! पाटलांची टीका

 मुंबई | राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज (२३ डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर वाकयुद्ध रंगले आहे. “उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे किंवा आदित्या ठाकरे या दोघांपैकी कोणाला तरी मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावाल होता. यानंतर सत्ताधारी पक्षातील आव्हाडांनी याला प्रत्युत्तर देत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल महाराष्ट्रात संभ्रमकरणे किंवा चर्चा करणे, आपला बाप अजारी असताना आपण आपल्या बापबद्दल चर्चा करतो. आपली ती संस्कृती आहे का?,” असा उलट सवाल त्यांना केला. 

दरम्यान, अधिवेशनाचा आज (२३ डिसेंबर) दुसरा दिवस होता. यावेळी पाटलांनी आव्हाडांचा खरपूस समाचार घेतला. पाटलांनी विधिमंडळात पत्रकारांनी बोलताना म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला घडविले. त्यामुळे उद्धवजींबद्दल त्यांच्या तब्येतीबद्दल चेष्टा करणे ही माझी संस्कृती नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला घडविले. माझ्या आई-बाबानी माझ्यावर संस्कार केले ते टीका करण्याचे नाही. माझे म्हणे उलट त्यांच्या हिताच्या दृष्टीने आहे. त्यांची तब्यात बरी नसताना त्यांनी सभागृहात येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी फक्त कामाचे वाटप करावे, हेच माझे म्हणे आहे. यावर आज आव्हाडांनी माझा बाप काढला. कारण आव्हाडांची ती संस्कृती आहे. माझी ती संस्कृती नाही.”

आव्हाड नेमके काय म्हणाले

“विरोधकांचे मागणी करणे, घोषणा देणे, आंदोलन करणे, निवेदन करणे, टीका करणे, हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर  टीका करून राजकारण करणे हे प्रगल्भता नसल्याचे ते उदाहरण आहे. कालच्या (२२ डिसेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा पाऊन तास बोलत होते. मुख्यमंत्री हे कुठल्याही विभागाची जबाबदारी त्यांच्यावर नाही. ते संपूर्ण मंत्रिमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल, तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येणार, अधिवेशनाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री विधानभवनात येवून गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल महाराष्ट्रात संभ्रमकरणे किंवा चर्चा करणे, आपला बाप अजारी असताना आपण आपल्या बापबद्दल चर्चा करतो. आपली ती संस्कृती आहे का?, जेव्हा एखादा माणून आजारी असे आजारपण हे नैसर्गिक आहे. कोणी स्वत: नाटक करत नसतो. त्यामुळे मला वाटेत यांची चर्चा करणे हेच म्हणजे विकृतपणेच आणि बालीशपणाचे लक्षण आहे. मराठीत म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.”

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले

“मी भविष्यकार नाही, त्यांच्या घराशी जी जवळीत होती ती अलकडच्या काळात नाही. मला तुमच्याकडून माहितीची अपेक्षा फक्त माझा मुद्दा एकच आहे. मी एक ठाकरे कुटुंबाचा चांगला हितचिंतक आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. याची मी वारंवार यांची मांडणी करत असतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमधील हिंदुना वाचवले. त्यामुळे उद्धवजींबद्दल त्यांच्या तब्येतीबद्दल चेष्टा करणे ही माझी संस्कृती नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला घडविले. माझ्या आई-बाबानी माझ्यावर संस्कार केले ते टीका करण्याचे नाही. माझे म्हणे उलट त्यांच्या हिताच्या दृष्टीने आहे. त्यांची तब्यात बरी नसताना त्यांनी सभागृहात येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी फक्त कामाचे वाटप करावे, हेच माझे म्हणे आहे. यावर आज आव्हाडांनी माझा बाप काढला. कारण आव्हाडांची ती संस्कृती आहे. माझी ती संस्कृती नाही. आव्हाडांनी उद्धव ठाकरे त्यांचा बाप वाटत असेल, का तर त्यांना त्यांच्या जवळ जायाचे असेल, का तर त्यांना एखादी क्लिअर करायची असेल. माला नाही क्लिअर करायची, माझा बाप हा निवडणूक लढला नव्हता. माझा बाप हा लोकांना उत्तर देण्यासाठी बांधिल नव्हता. राजकारणात कोणी तुम्हाला नारळ देऊन निमंत्रण दिले नव्हते. जेव्हा तुम्ही राजकारणात येता. निवडून येता, मंत्री होता, तेव्हा तुम्ही लोकांसाठी बांधिल असता आणि ही तुमची जबाबदारी आहे. आणि त्यावर आम्ही म्हटले, पुन्हा सहानभुतीने बोलो की तब्यात बरी नसेल तर येऊ नका, फक्त जबाबदारी सोपवा. यात ऐवढा राग येण्यासारखे काय आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व सातबारा मिळणार डिजिटल स्वाक्षरीने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

‘मी घटनेनुसार काम करतोय’, राज्यपालांचं कोशारीचं प्रत्युत्तर!

News Desk

शरद पवारांच्या पोटात दुखू लागल्याने आजच ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलेय – नवाब मलिक

News Desk