HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरा हिंसाचार प्रकरण : HW न्यूज नेटवर्क आणि पत्रकारांविरोधातील खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नवी दिल्ली | HW न्यूज नेटवर्क (HW News Network) आणि त्यांच्या पत्रकारांविरोधातील खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. हे प्रकरण उत्तर-पूर्व राज्यातील जातीय हिंसाचाराच्या अहवालाशी संबंधित आहे. या प्रकरणीची सूचीबद्ध न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

 

या केससाठी वकील संदीप देशमुख आणि सिनियर कौन्सिलर सिद्धार्थ लुथरा आज  न्यायालयात हजर राहणार आहेत. गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला त्रिपुरा पोलिसांनी HW न्यूज नेटवर्कच्या पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा या दोन महिला पत्रकारांना आसाममधून अटक केले होते. मात्र, एका दिवसानंतर त्रिपुरातील स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. पत्रकार समृद्धी आणि स्वर्णा या दोघींनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरा राज्यात उसळलेल्या हिंसाचाराचे वार्तांकन करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, या दोन्ही महिला पत्रकारांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आणि त्याच्या पत्रकारांवर त्रिपुरा पोलिसांनी शत्रुत्व आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला होता.

 

या प्रकरणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने डिसेंबर २०२१ मध्ये HW न्यूज नेटवर्क आणि त्यांच्या दोन पत्रकारांविरुद्धच्या सर्व फौजदारी कारवाईला स्थगिती दिली होती. आणि त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याच्या पत्रकारांच्या याचिकेवर राज्य सरकारची प्रतिक्रिया मागितली होती.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर! – नाना पटोले

Aprna

काय आहे #MeToo कशी सुरुवात झाली, तुम्हाला माहित आहे का ?

Gauri Tilekar

चीनने एकही गोळी न चालवता आपले २० जवान शहीद झाले ?, राऊतांचा मोदींना सवाल

News Desk