मुंबई | गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Elections) अगदी तोंडावर आली आहे. गुजरातची सत्ताकाबीज करण्यासाठी अनेक पक्षांनी आपली कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शनिवारीपासून (१९ नोव्हेंबर) ते सोमवारपर्यंत (21 नोव्हेंबर) तीन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान मोदी 8 सभा घेणार आहेत. तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सोमवारी (21 नोव्हेंबर) गुजरातच्या नवसारी येथे सभा घेणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.
दरम्यान, यापूर्वी भाजप आणि काँग्रेस 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदी नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादी राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आदी नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना आपल्याला दिसतील.
असा आहे पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा
आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान हे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांच्या 3 दिवसीय दौऱ्यात ते तब्बल 8 सभा घेण्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान वापी येथे रोड शो करणार आहे. तर वलसाडमध्ये पंतप्रधान जाहीर सभा घेणार आहेत. तसेच 20 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान भगवान शिवचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमनाथ मंदिराला भेट देण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर पंतप्रधान मोदी हे गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ, अमरेली, धोर्जी आणि बोटाड येथे तब्बल चार सार्वजनिक सभा घेणार आहेत. गांधीनगर येथील राजभवन येथे पंतप्रधान मोदींचा मुक्काम असेल. तर २१ नोव्हेंबरला पंतप्रधान दिल्लीला परतण्यापूर्वी सुरेंद्रनगर, जंबुसर आणि नवसारी येथे देखील जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान हे पुन्हा सहा दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा बुधवारीपासून (23 नोव्हेंबर) ते सोमवारीपर्यंत (28 नोव्हेंबर) होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.