मुंबई | मध्य रेल्वेवरील (Central Railway) कर्नाक पुलाचे पाडकाम पूर्ण झाले आहे. या पुलाचे पाडकाम आज (20 नोव्हेंबर) दुपारी चार वाजता पूण झाल्याची माहिती मध्य रेल्वेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून दिली आहे. या पुलाच्या कामानंतर सीएसएमटी ते ठाणे लोकल धावल्याची माहिती मध्य रेल्वे दिली आहे. कर्नाक आणि कोपरी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने 27 तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. यानंतर नियोजित वेळेपूर्वीच कर्नोक पूल पाडण्याचे काम दोन तास आधीच पूर्ण करण्यात आले. परंतु, हार्बर लाईन मार्गावर रात्री आठ वाजल्यानंतर लोकल सेवा सुरू होणार आहे.
दरम्यान, कर्नाक पुल पाडण्यासाठी मध्य रेल्वे शनिवारी (19 नोव्हेंबर) रात्री 11 वाजल्यापासून 27 तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. हा पूल ब्रिटिशकालीन असून हा पूल 1868 मध्य बांधला होता. यानंतर हा पुल पाडण्याचे काम नियोजित वेळेच्या दोन तास अधीच झाले आहे. या मेगाब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी जाण्याऱ्या ट्रेन भायकळापर्यंत सुरू होत्या. पूल पाडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गावर वाहतूक पूर्णपणे सुरु झाली असून हार्बर लाईवर अद्याप काम सुरू आहे. हार्बर लाईवर रात्री आठ वाजता लोकल सेवा सुरू होईल, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
#27HrsBlock #CarnacBridge
Up & Dn Slow line and Up & Dn fast line restored before schedule.
First local train departed CSMT at 15.50 hrs for Thane passing Carnac Bridge dismantling site at 16.00 hrsHarbour line, 7th line and Yard work in progress as per schedule. pic.twitter.com/gJ86OCPXx0
— Central Railway (@Central_Railway) November 20, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.