HW News Marathi
राजकारण

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलेय”, उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलेय आहे”, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. “महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकात समावेश करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे”, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयात लढाई लढवू,” बोम्मईंना प्रत्युत्तर दिले. यावर पुन्हा बोम्माई म्हणाले, ““महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे,” असे ट्वीट त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषदे घेऊन शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “गेले काही दिवस किंवा काही महिने म्हणा, आपण पाहतो आहोत. विशेषता महाराष्ट्रात मिंदे सरकार किंवा खोके सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची जी सातत्याने अवहेलना होत आहे. मग, ते महाराष्ट्रातील उद्योग पळविणे असो, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असू दे, सतत्याने अवहेलना होत आहेत. अचानक आज कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या अंगात भूत संचारले आहे. जणून काही महाराष्ट्रात माणसे राहत नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाहीये. कोणीही यावे, आणि टपलीत मारावे. आणि आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय नुसते बोलत गप्प बसायचे. हे आतापर्यंत खूप झाले. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर मुळमुळीत मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्या कोणाकडून दिल्या जात आहेत. ज्यांनी अपमान केलाय, त्यांच्या पक्षातील लोकांकडून दिल्या जात आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांचे सीमा प्रश्नावरील विधान

नुकतेच सांगलीतील जत तालुक्यातमधील 40 दुष्काळग्रस्त गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. यानंतर कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना आपल्या राज्यात आणण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.  या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई म्हणाले, “सांगलीतील जत तालुका दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई असते. या गावांना पाणी देऊन आम्ही मदत केली आहे. या तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या गावांनी केलेला ठरावाचा आम्ही गंभीरपणे विचार करत असून सीमा विकास प्राधिकरणाद्वारे आम्ही महाराष्ट्रातील कन्नड शाळांना अनुदान देणार आहोत.”

यानंतर बोम्माईंनी बुधवारी रात्री ट्वीट करत फडणवीसांच्या विधानाला प्रत्युत्तर करत बसवराज बोम्माई ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चिथावणीखोर विधान केले आहे. आणि त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहेत. तर कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे.”  बोम्मई पुढे म्हणाले, “2004 पासून महाराष्ट्र सरकारने दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्याला आतापर्यंत यश आले नाही. आणि यापुढेही यश मिळणार नाही. आम्ही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत”, असे त्यांनी फडणवीसांना सांगितले आहे.

संबंधित बातम्या

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतनंतर महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यावर केला दावा

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

Related posts

पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात !

News Desk

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे पाच नगरसेवक येणार अडचणीत

News Desk