मुंबई | “पालकासारखे बोला, रस्त्यांचे उद्घाटन होईल. कर्नाटकने जे महाराष्ट्राचे रस्ते बंद केले त्याचे काय? त्यावर पण बोला”, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान हे उद्या (11 नोव्हेंबर) नागपूरमध्ये समृद्ध महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याासाठी येणारआहे. उद्धव ठाकरे हे आज (10 डिसेंबर) ४२ व्या मराठवाडा (घनसावंगी) साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आदी मुद्यावर राज्य सरकारवर निशाणा साधाल.
उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्या राज्यपालांच्या विधान झाकतील. पंतप्रधान येताहेत. मला त्यांना सांगायचे आहे पालकासारखे बोला. रस्त्यांचे उद्घाटन होईल पण कर्नाटकने जे महाराष्ट्राचे रस्ते बंद केले त्याचे काय? त्यावर पण बोला. बाळासाहेबांची भूमिका ते संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरूंगात गेले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भाषिक अत्याचार होतो आहे तो त्यांना समजायला हवा. सीमाप्रश्नावर पंतप्रधानांनी बोलावे. महिलेचा अपमान केलेल्या मंत्र्याला अजूनही मंत्रिमंडळात. मी होतो तेव्हा काढून टाकले होते. आज स्वातंत्र्य किती टिकवले किती? ते टिकवण्याचे काम तुम्ही करायला हवे. वंदेमातरम, चले जाव ह्या दोन शब्दांची ताकद त्याकाळी दिसली. आम्हाला तुम्हाला घडवायचे. तुकाराम महाराजांचा अभंग उल्लेख. आजचे राजकीय दारिद्रय संपवायला हवे ती अपेक्षा तुमच्याकडून.”
“आपल जरी युवकांकडे लक्ष दिल नाही तरी युवकांचे लक्ष असत. साहित्य संमेलनाला मी पहिल्यांदाच आलो आहे. हे व्यासपीठ माझे नाही. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. कौतिकराव पाटलांचे कौतुक. शेषराव मोहितेंच्या लिखाणचा संदर्भ साहित्यिक हा माणूसच. आपल्या बुद्धीची मशागत साहित्यिक करतात. सगळी प्रतिभावान माणसे इथे उपस्थित आहेत. मराठवाड्याची भूमी किती प्रतिभावान हे सांगायला नको. ही संतांची भूमी संस्कार, शौर्य दिले. आम्ही संत शिकवणावर चालणारी माणसे”, साहित्या संमेलनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या दिशेवर देश चालला
उद्धव ठाकरेंनी साहित्यकांचे दाखले देत राज्यपालांच्या विधानावर निशाणा साधला, “वाचेल तो वाचेल. आपण राज्यपालांचा उल्लेख केलात. महापुरूष आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या दिशेवर देश चालला आहे. पण कुणी दैवतांवर बोलू नका. जो बोलेले त्याला जाब विचारणारच. मी बोलण्यापेक्षा ऐकायला आलो आहे. काही चुकत असेल तर कान धरा. लक्ष्मीकांत देशमुखांचे परखड विधान आठवले.”
उद्धव ठाकरे शाळेतील आठवण सांगताना म्हणाले…
यावेळी उद्धव ठाकरेंनी शाळेतील धड्यातील आठवण सांगताना म्हणाले, “शाळेत धडा होता देश म्हणजे माणसं ते दगड धोंडे नाहीत. ती भारतमाता. जर राज्यकर्ते चुकत असतील तर साहित्यिकांनी चूक दाखवून द्यायला हवी. राजा चुकला तर जनतेचे नुकसान होईल. हिटलरच्या वेळी पण प्रचंड विरोध झाले, छळ झाले. खरी परिस्थिती सांगितली की पुन्हा तुरूंगात जावे लागायचे. आपल्याकडे गुप्त मतदान पण आता तुम्ही दिलेले मत तुम्हाला तरी कळेल का? कस सुरत गुवाहटी गोवा ही असली लोकशाही आम्ही नाही मानत. मग एकदा जाहीर करा लोकशाही संपली. राजकारण हे वाईट नाही तरुण तरुणींनी राजकारणात या उज्जवल भवितव्यासाठी या.”
समान कायदा हवा
समान कायदासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्ता का हवी तर मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी हवी. निवडून देण्याचा जसा अधिकार आहे तसा परत बोलावण्याचा पण हवा? खरच देशात लोकशाही आहे का? सावरकर म्हणाले होते बंदूका हाती घ्या. मी म्हणेन लेखणी हाती घ्या. सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत. कायदामंत्री, उपराष्ट्रपती त्यावर बोलताहेत. पण आम्ही बोललो तर अवमानना व्हायला हवेच पण समान कायदा हवा. न्यायमूर्ती पण पंतप्रधान नेमणार असतील तर काय फायदा.”
नोटाबंदीवरून मोदींना ठाकरेंनी टोला लगावाल
नोटा बंदीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मधल्या काळात इंग्लंडला महिला पंतप्रधान झाल्या. त्यांनी राजीनामा दिला कारण ठरवलेले धोरण फसल. ४५ दिवसांत नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. आज आपल्या देशात ८ वर्षानंतर सुध्दा नोटबंदीवर कायदेशीर उहापोह सुरु पण जी मनुष्यहानी आर्थिक नुकसान झाले ते झाले. ते आता परत येणार नाही.”
मी वारसा घेऊन पुढे चाललो – उद्धव ठाकरे
“आणीबाणी काळात दुर्गाबाई भागवत, करुंदकर होते त्यांचे लिखाण वाचायला हवे, करुंदकरांचे फॅसिस्ट वाचणे आवश्यक. कश्याप्रकारे सत्ता चालवतात. हे काम साहकत्यकांकडून व्हायला हवे. ही संतांची भूमी. निझामाचे अत्याचाराचा संघर्ष केला. पु.ल चा एक किस्सा. नैराश्याचे ढग आले की जीवन वाईट नाही हे साहित्यिकांनी सांगायला हवे. सगळेच प्रवाहपतित होणार असतील तर कठीण. आजोबा साहित्यिक होतेच प्रबोधन सुरु केले, संयुक्त महाराष्ट्रात अग्रेसर, अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी पृर्वा केली नाही. माझे वडील सांगायचे आजोबांबद्दल सांगायचे. तेच काम बाळासाहेबांनी व्यंगचित्र, मार्मिक, सामना काढला. संघर्ष केला. म्हणूनच तो वारसा घेऊन मी पुढे चाललो”, उद्धव ठाकरे म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या भीक मागा, विधानावर उद्धव ठाकरेंचा टोला
मी आजही तुमच्या कुटुंबातीलच. महाराजांच्या किल्ल्यांचे चित्रण केले, वारीचे दर्शन घडवले. प्रतिभा कोणाला कधी मिळेल सांगता येत नाही. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आयुष्य जाते समजायला. दुसरे वैभव आपली लेणी. तुकोबांना त्रास दिला. चंद्रकांत पाटलांचा समाचार. तुम्ही कोण आम्हाला भिक मागितली शिकवणारे. संत कुठल्या शाळेत शिकले होते. ग्रामीण भागाची माणसे मोठी होतात. ग्रामीण साहित्य फार मोलाचे. चंद्रकांत पाटलांच्या भीकेची आम्हाला गरज नाही. कुसुमाग्रजांची कविता उल्लेख.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.