HW News Marathi
राजकारण

भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला तात्काळ निधी दिला जाणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर | “रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालय तसेच कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला पुढील दोन महिन्यांत तात्काळ निधी दिला जाईल”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (28 डिसेंबर) प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

“वरळी येथील कामगार रुग्णालयात अतिदक्षता व सुपर स्पेशालिटी सुविधा देण्यासाठी ईएसआयसीला निर्देश दिले जातील. रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

“आर.एन. कूपर रुग्णालयात नेफ्रोलॉजी, कॅथलिक युनिट उभारण्याच्या परवानगीसह विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुविधा देण्यासाठी संबधितांना तात्काळ निर्देश दिले जातील”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर, विलास पोतनीस, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला होता.

Related posts

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk

सांगलीचे खासदार संजय पाटील यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा!

News Desk

ती भेट अखेर राहूनच गेली! विक्रम गोखलेंना पंकजा मुंडेंनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

Manasi Devkar