HW News Marathi
महाराष्ट्र

जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे काल पुणे येथे आगमन  

पुणे । पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी (१५ जानेवारी) सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले.

आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० (G20 Council) समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

आगमनप्रसंगी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तुतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहेत.

‘नमस्ते इंडिया’

जी-२० परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू राजशिष्टाचार अधिकारी यांनी विषद केला असता स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुम्ही शिवसेनेला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवलं, चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर सामनातून टीका!

News Desk

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप 40 स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Aprna

ओबीसी आरक्षण अडचणीत आणि मंत्री परदेशात; पडळकरांची महाविकासआघाडी सरकारवर टीका

Aprna