मुंबई | जगात ओमायक्रॉनचा पहिला बळी ब्रिटनमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. ओमायक्रॉनमुळे पहिली मृत्यू झाल्याची पहिली नोंद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ओमायक्रॉनच्या पहिल्या बळीची माहिती दिली आहे.
बोरिस म्हणाले, “ओमायक्रॉनची आता चिंता वाढली असून हा नवा व्हेरियंटची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मग या व्यक्तीची ओमायक्रॉनमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.” ओमायक्रॉनने दक्षिण आफ्रिकेत धुमाकुळ घातला आहे. आणि दक्षिण आफ्रिकेतून जगभरात ओमायक्रॉनचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. ब्रिटनमध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आता जगाची चिंत वाढली आहे.
British Prime Minister Boris Johnson said on Monday the first patient had died after contracting the #Omicron variant of the #coronavirus: Reuters
— ANI (@ANI) December 13, 2021
भारतात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आदी राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३७ वर येवून पोहोचल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.