HW News Marathi
राजकारण

बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांना ‘नो एंट्री’; नेमके काय आहे प्रकरण ?

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचे नगरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान शुभांगी पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या संगमनेरमध्ये  निवासस्थानी भेटीसाठी गेल्या होत्या. परंतु, बाळासाहेब थोरात उपचारासाठी मुंबईत असल्याने शुभांगी पाटील यांची भेट झाली नाही. परंतु, बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. उपचारासाठी मुंबईत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

तुम्हाला बाळासाहेब थोरात यांच्या गेटवरच अडविले, असा प्रश्न शुभांगी पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले, “अडविले नाही, घरात कोणीच नाहीये, इथे कोणी अडविले नाही. मला वाटले की, घरात कोणी तरी असेल, पण घरात कोणी नाही येत तर मग कश्याला त्रास देईचा. कारण, घरात ताईसाहेब वैगेरे कोणीच नाहीये. मी सकळी साहेबांना फोन केला होता. साहेबांचे आणि माझे बोलणे पण झाले, साहेबांच्या खात्याला दुखापत झाल्यामुळे म्हणून उपचारासाठी रुग्णलयात आहेत.”

काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंचे निलंबन

काँग्रेसकडून नाशिक मदारसंघात डॉ. सुधीर तांबे अधिकृत उदमेवार होते. पण डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत यांनी पक्षासोबत बंडखोर करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राज्याचे राजकारणात एकच खळबळ माजली. यानंतर काँग्रेसकडून सत्यजीत तांबे यांना निलंबित केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली.

बाळासाहेब थोरातांच्या खांद्याला दुखापत

नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. यादरम्यान बाळासाहेब थोरात नागपूरच्या सेमिनरी हिल इथे मॉर्निंग वॉक पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. यानंतर बाळासाहेब थोरात यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर बाळासाहेब थोरात हे हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडले. आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

 

Related posts

उद्धव ठाकरेंच्या सभेत भाडोत्री माणसे, नितेश राणेंचा आरोप

News Desk

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार

News Desk

#AyodhyaCase | अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

News Desk