मुंबई | “आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर सरकार स्थापन केलेले आहे”, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्ताने केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज (23 जानेवारी) 97 वर्षाचे जयंत आहे. या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्रचे अनावरण दिले आहे. शिंदेंनी सहा महिन्यापूर्वी पक्षासोबत बंडखोरी करू केली होती. यावेळी शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदारांनी देखील पक्षासोबत बंडखोरी केली होती. यावेळी शिंदेंनी त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा त्यांनी केली होती. आता हे संपूर्ण प्रकरण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत.
तुमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या काही आठवणी आहेत का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारल्यावर ते म्हणाले, “सगळे योगदान त्यांचे आहे. एकही क्षण असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही. डोळ्यासमोर त्यांनी जो काही आदर्श ठेवला आहे. बाळासाहेब ठाकरेंची जी काही शिकवण आहे. सर्व सामान्य माणसाला न्याय देणे, 80 टक्के समाज कारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरेंचा मुल मंत्र आहे. तो घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार पुढे नेहण्याचे आम्ही काम करतोय. आणि म्हणून त्यांच्या विचारांवर आधारीच आमचे सरकार आहे. सर्व सामान्य माणसाला न्याय देणार सरकार. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर सरकार स्थापन केले आहे. आणि म्हणून थोड्या थोडक्यात कालावधीमध्ये अनेक जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या शिकवणीमुळे आणि त्यांच्या आदर्शमुळेच.”
विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे होणार अनावरण
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री म्हणाले, “आज आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंचा जन्म दिवस म्हणजे महाराष्ट्रातील तम्मा शिवसैनिकांना आनंदाचा दिवस असतो. त्यांच्या वाढ दिवस आपण मोठ्या उत्सहात साजरा करत असतो. आणि आज देखील अनेक ठिकाणी त्यांच्या या जयंती निमित्त मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत. अनेक आरोग्य शिबीरे असतील, रक्तदान शिबीर असतील. अनेक समाजविमुख उपक्रम या ठिकाणी सुरू आहेत. आणि आज विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात देखील आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र आम्ही लावणार आहोत. अध्यक्षांना मी धन्यवाद देतो. ज्याचे योगदान राज्यात नाही तर देशभरात आणि जगभरामध्ये त्यांची क्रिर्ती बाळासाहेब ठाकरेंची पसरली. अशा व्यक्ती महत्वाचे तैलचित्राचे अनावरण देखील होणार आहे. बाळासाहेबांमुळेच सर्व सामान्य कार्यकर्ते आज मोठ मोठ्या पदाची जबाबदारी स्वीकारत आहेत. माझ्यासारखा एक सर्व सामान्य कार्यकर्ता देखील बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रभावीत होऊन. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे आज या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून मी काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी बाळासाहेबांना विनंम्र अभीवादन करतो.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.