HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई | “शिवसेना ही एकच आहे. एकच राहणार आणि एकच असणार आहे. त्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही”, असे विधान (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाला दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आज (8 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सत्तांतर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आणि शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून शिंदेवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 14 तारखेपासून सलग होणार आहे. आणि निवडणूक आयोगाची मात्र सुनावणी पुर्ण झालेली आहे. दोन्ही बाजूकडून वादप्रतिवाद केलेला आहे. वादे प्रतिदावे केलेले आहेत. दावे खोडा खोडी झालेली आहे. दावे खोडणे म्हणजे दावे खोडणे आणि सगळ्याच काही गोष्टी. शेवटी निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेंना दोन्ही बाजूना आपले जे काही म्हणणे आहे. लिखित स्वरुपता सादर करण्याचे जे काही आदेश दिलेलेल आहेत. त्याप्रमाणे शिवसेनेने मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेना ही एकच आहे. एकच राहणार आणि एकच असणार आहे. त्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेनेने आमच्याकडून आमचे जे काही मुद्दे होते. हे निवडणूक आयुक्तांसमोर मांडलेले आहेत. आणि लेखी स्वरुपात देखील मांडलेले आहेत. मी आज आपलेला ऐवढ्यासाठी बोलविलेले आहे. सहाजिक आहे. नेमके काय होणार, हा प्रश्न जे आमच्यासोबत हजारो लाखोच्या संख्येने शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रेमी जनता आहे. माता-बहिणी आणि बांधव आहेत. त्यांच्या मनात हा संमभ्र आहे.”

“कोणताही पक्ष स्थापन होतो. तो जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. त्याचप्राणे शिवसेना एका हेतूने शिवसेना प्रमुखांनी 1966 साली त्यांची स्थापना केली. पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर आलंबून राहणार असेल तर मला असे वाटते. उद्या कोणीही म्हणजे जगातील 1, 2 आणि 3 नंबरचे उद्योग पती आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या पक्षाला काही अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Related posts

“कोणत्याही ST कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका!” – अनिल परब

News Desk

मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास सुरू

News Desk

जाणून घ्या…मतदानाला जाताना कोणती ओळखपत्र सोबत घ्यावी

News Desk