HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मेगा टेक्स्टाईल प्रकल्पला मिळाली मंजूर; उपमुख्यमंत्र्यांकडून माहिती

मुंबई | राज्यात 10 हजार कोटी रुपायांचा मेगा टेक्स्टाईल प्रकल्प (Mega Textile Project) उभारला जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात गेले आहे. या मुद्द्यांवर महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. तसेच सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी आज (17 मार्च) माध्यमांशी बोलताना मेगा टेक्स्टाईल प्रकल्पसंदर्भात सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यात मोठा प्रकल्प उभा राहात आहे. मेगा टेक्स्टाईल प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक आहे. या प्रकल्यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार असून अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. यानंतर नागपूरला येणारा टाटाचा एअरबस प्रकल्प हा देखील गुजरातला गेला. त्यापाठोपाठ मेडिकल डिव्हाईस आणि बल्क पार्क प्रकल्प देखील दुसऱ्या राज्यात गेले.

 

Related posts

कोरोनामुळे राज्यातला लॉकडाऊन वाढणार ?

News Desk

झोपेत सरकार कसं आणायचं ते अजित पवारांना चांगलंच माहीत – चंद्रकांत पाटील

News Desk

गोपीचंद पडळकर सुसाट ; पवारांनंतर आत्ता ठाकरेंना आव्हान

News Desk