HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट!

मुंबई। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या भावना समजाव्या यासाठी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येत्या २ सप्टेंबरला भेटीची वेळ दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील एका खासदार प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभरात मूक आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी तातडीने पावलं उचलावी अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशाराचा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

खासदारांचे शिष्टमंडळ भेटणार

संभाजीराजे छत्रपती २ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या भावाना समजाव्यात यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींची भेट मागितली होती. त्यानुसार राष्ट्रपतींनी भेटीची वेळ दिली आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात खासदारांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन

Aprna

गणेश नाईक मतदारसंघातील कामं करत नाहीत, मला सीमोल्लंघन करावंच लागेल – मंदा म्हात्रे

News Desk

नाहीतर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल…आयुक्तांचा इशारा

News Desk