HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना दुसरा धक्का! नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी

नाशिक | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे शब्द वापरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. महाड कोर्टाने काल(२४ ऑगस्ट) नारायण राणेंना जमीन मंजूर केला. मात्र आता नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यात राणेंना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाशिकमध्ये राणेंविरोधातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) कोकणात जाऊन अटक केली. रात्री उशिरा राणेंना कार्टाकडून अटी शर्तींसह जामीन मिळाला. मात्र, यानंतर लगेचच नाशिक पोलिसांनी नोटीस बजावत राणेंना दुसरा धक्का दिला आहे.

100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

एकीकडे जिथे नारायण राणे यांना अटक होत होती तिथेच दुसरीकडे सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले व ते आमने सामने आले. नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना भाजप राडा प्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केलाय. भद्रकाली पोलीस ठाण्यात हा गुन्हे दाखल झालाय. सेना भाजप अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत. मंगळवारी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी समोरा समोर राडा केला होता.

दोन शब्दात व्यक्त

नारायण रामे यांना जमीन मिळाल्यावर त्यांनी पाहिलं ट्विट केलं. नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नारायण राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे. केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

४ अटींवर जमीन मंजूर

नारायण राणे यांना कोर्टाने तीन अटींवर जमीन केला आहे.

– राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

– त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे.

– राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल

– 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाऊ नका, राणे समर्थकांचा विनायक राऊत यांना इशारा

News Desk

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar

घुग्गूस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna