HW News Marathi
महाराष्ट्र

कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करा, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे निर्देश!

मुंबई । कंत्राटदार नागरिकांची कामे करत नसल्याच्या तक्रारीत वारंवार वाढ होत आहे, अशा काम न करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या विनंतीनुसार पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामासंदर्भात आज आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

पैठण तालुक्यातील औरंगपूरवाडी, दरकवाडी येथील 33/11 के. व्ही. चे उपकेंद्र उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी भुमरे यांना देण्यात आली. पैठण तालुक्यातील प्रलंबित 48 ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे, तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पैठण तालुक्यातील दरकवाडी, औरंगपूरवाडी, राहतगाव येथील 33/11 के. व्ही. चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना दिली. यावेळी प्रधान सचिव ऊर्जा दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक व संचलन संजय ताकसांडे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

Aprna

जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेल्या चहावाल्याला कोरोनाची लागण

News Desk