HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्वव ठाकरेंना जे करायचयं ते करु दे, मला जे करायचयं ते मी करणार’, अटकेनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलच अंगलट आलं आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली आहे. पण अटक केल्यानंतर सुरुवातीला नरमाई दाखवणारे राणे यांनी मुख्यमंत्रीं उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. त्याला जे करायचंय ते करु देत, मला जे करायचयं ते मी करणार असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदावर ठाकरे कायम राहणार नाहीत असा टोलाही लगावला आहे.

ते कायम मुख्यमंत्री राहणार नाहीत, अशाप्रकारे जर ते कायद्याचा गैरवापर करत असतील तर

राणे यांना अटक झाल्यानंतर एका वृत्तवाहीनीबरोबर व्हिडीओ कॉलच्या माध्यमाने त्यांनी संवाद शाधला. यावेळी महिला पत्रकाराने त्यांना उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे असा प्रश्न विचारला होता. त्यावर राणे यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये कुछ नही कहूंगा असे म्हणत उद्धव यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच ते कायम मुख्यमंत्री राहणार नाहीत, अशाप्रकारे जर ते कायद्याचा गैरवापर करत असतील तर आम्ही सुद्धा राजकारणात आहोत असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण जेवत असताना आपल्याला अटक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच पोलिसांकडे अटक वॉरंट नसताना मला संगमेश्वरात आणलं. त्यांचा हेतू चांगला नसून आपल्या जीवाला धोका असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच मी त्यांना कानाखाली मारेन असं म्हटलंच नसल्याचा दावाही राणे यांनी यावेळी केला.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख…

सकाळपासून सुरू झालेली आंदोलनं अजूनही राज्यात ठिकठिकाणी होत आहे. दुपारी आज नारायण राणे यांना अखेर अटक झाली आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत फटाके फोडण्यास सुरूवात केली.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. आज युवासैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून स्तुती केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणखी जल्लोष वाढल्याचं पाहण्यास मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंनी भाजपची कार्यकारणी जाहीर केल्यानंतर टीमचे केले अभिनंदन

News Desk

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला NCBकडून क्लिनचीट

Aprna

आयुक्त संजय पांडे यांचा हस्ते पात्र सहायक पोलीस उप निरीक्षकांना पदोन्नती

Aprna