HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थोपाटली शिवसैनिकांची पाठ!

मुंबई। सत्तेत आल्यानंतर शिवसेनेनं शहाणपण दाखवत मवाळ भूमिका घेतली होती. पण, आज शिवसैनिकांचा आक्रमक बाणा आज पाहण्यास मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत शिवसैनिकांनी राज्यभर भाजप कार्यालयावर एकच हल्लाबोल केला. शिवसैनिकांच्या या धाडसाचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक करत पाठ थोपडली आहे.

नारायण राणे आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाही, पण आज शिवसैनिकांनी आपले नवे रुप दाखवत भाजपला गारद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हात उगारण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपासून ते राज्यभर जोरदार निदर्शनं केली. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर आक्रमकपणे हल्ला केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख…

सकाळपासून सुरू झालेली आंदोलनं अजूनही राज्यात ठिकठिकाणी होत आहे. दुपारी आज नारायण राणे यांना अखेर अटक झाली आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत फटाके फोडण्यास सुरूवात केली.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. आज युवासैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून स्तुती केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणखी जल्लोष वाढल्याचं पाहण्यास मिळत आहे.

तर, आज सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयांवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबई, ठाण्यात, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गात शिवसैनिकांनी भाजपविरोधात जोरदार राडा घातला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे शिवरायांच्या नावावर ठाम तर मनसे आमदार दि. बा. पाटील नावावर अडून

News Desk

नितेश राणेंना जामीन की अटक? उद्या निर्णय

News Desk

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna