HW News Marathi
देश / विदेश

नारायण राणेंच्या अटकेनंतर जे.पी. नड्डांनी ट्विट करत दिले असे संकेत!

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज(२४ ऑगस्ट) अटक केल्यावर त्यांचे पडसाद आता दिसू लागले आहेत. हा वाद तापला असतानाच ठाकरे सरकारने थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करून मोदी सरकारला जबर धक्का दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अ‍ॅक्टिव्ह झाले आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भात ट्वविट करत पक्षाच्या भविष्यातील धोरणाबाबत थेट संकेत दिले आहेत.

अटक ही घटनात्मक मूल्यांचे हे हनन करणारी आहे

नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी त्याचा निषेध दर्शवला आहे. जे.पी.नड्डा यांनी ट्विट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे.” महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंची केलेली केली अटक ही घटनात्मक मूल्यांचे हे हनन करणारी आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे आम्ही ना घाबरणार, ना दबून राहणार. भाजपला जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही मंडळी त्रस्त आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू, जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील”, असे जे.पी. नड्डा म्हणाले आहेत.

उद्या कोर्टात सुनावणी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. न्यायालयाचे अधिकृत तास संपल्याने आज याचिका दाखल केली जाऊ शकत नाही, असे त्यांचे वकील सांगतात. राणे यांची याचिका उद्या तातडीने सुनावणीसाठी दाखल केली जाईल.

नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

नारायण राणे यांच्यावर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तसेच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअतंर्गत आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती

नारायण राणे यांना अटक करण्यात अली आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.

सॅच्युरेशन नॉरमल आहे, बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा

News Desk

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर

News Desk

विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, काही वेळातच जामीन मंजूर

News Desk