HW News Marathi
महाराष्ट्र

“चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी”- अजित पवार

पुणे। गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच सावट आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले आहे. येत्या 1 डिसेंबरपासून कोरोना नियमात शिथिलता आणत शहरातील सर्व चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहिल. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनासाठी तयार करण्यात आलेली जम्बो रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पण सरकार चाललंय ना बाबा…

यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये पडेल अस वक्तव्य नुकतंच केलं आहे. आणि नारायण राणेंच्या या दाव्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा दावा केला. ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त विषय खेचू नये

तसेच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा बऱ्यांपैकी पगार वाढलेत, तरी टोकाची भूमिका का, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. पवारांनी वेतन वाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीनंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. मग सर्वजण उद्या विलीनीकरणाची मागणी करतील. एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त विषय खेचू नये, असा सल्ला ही पवारांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले – निलेश राणे

News Desk

‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण…’ प्रितम मुंडे याचं वक्तव्य!

News Desk

बिहारमध्ये विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल असे वाटते काय? राऊतांचा भाजपला सवाल

News Desk