HW News Marathi
महाराष्ट्र

“मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे”-नाना पाटेकर

पुणे | प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक खूप मोठं महत्वाचं मत व्यक्त केलं आहे. मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे. मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे, ते पण इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे, असं मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे.

त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे

“सगळ्या गोष्टी सरकारच्या भरोश्यावर शक्य नाही जे जमेल ते प्रत्येकाने करावं, असं सांगत काश्मीरमध्ये वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न सुरु आहेत.. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे.. ते ही आपलेच असून दोन तीन पिढ्या पूर्वी कन्व्हर्ट झालेत… सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा, येणारा प्रत्येक जण हा जाणार आहे याच्यावर विश्वास ठेऊन चांगलं काम करायला हवं”, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

संपत्तीचा किती संचय करणार आहोत आपण

ते पुढे बोलताना म्हणाले, ” “संपत्तीचा किती संचय करणार आहोत आपण… एक दिवस जाणार आहोत यावर आपण कधी विश्वास ठेवणार आहोत… माझ्या सातबाऱ्यावर इतकं आहेत, तितकं आहे… असं लोक सांगतात पण माझ्या सातबाऱ्यावर खूप लोकं आहेत, असं मी अभिमानाने सांगतो”, असंही नाना म्हणाले आहेत.

नाम संस्थेतर्फे लोकांना मदत

“नामला आतापर्यंत खूप लोकांनी पैसे दिलेत……. लोकांना विश्वास आहे की नामला दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होणार नाही. याची मला ग्वाही देण्याची गरज नाही किंबहुना पडणारही नाही, त्यांचे पैसे योग्य कामाला लागतात, हा लोकांना विश्वास वाटतो”, असं नाना म्हणाले आहेत. नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासल्या जवळच्या बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आलीत. ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीय. त्यावेळी नाना बोलत होते.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल, डिझेल नाही तर आता ‘या’ तेलावर चालणार गाड्या, नितिन गडकरींचे संकेत

News Desk

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

News Desk

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

Aprna